पिणे कमी करणे, सुरक्षितपणे थांबणे आणि जवळच्या व्यक्तीला साथ देणे याबद्दल सोप्या भाषेतील मार्गदर्शिका. प्रत्येक मार्गदर्शिका सार्वजनिक आरोग्य स्रोतांच्या आधारे लिहिली आहे; ते स्रोत शेवटी दिले आहेत.
दररोज जास्त दारू पिणे अचानक थांबवल्यास धोकादायक विथड्रॉल (दारू थांबवल्यावर शरीराला होणारा त्रास) होऊ शकते. आधी डॉक्टरांशी बोला, आणि कोणत्या लक्षणांसाठी आपत्कालीन मदत घ्यावी लागते हे जाणून घ्या.
तुमचे AUDIT गुण म्हणजे 0 ते 40 मधली एक संख्या. दारू पिण्यामुळे असलेला धोका कोणत्या पातळीचा असू शकतो, हे ती सुचवते. ही पहिली तपासणी आहे, निदान नाही, आणि प्रत्येक पातळीसाठी एक योग्य पुढचे पाऊल आहे.
हार्ड ड्रिंकचा (व्हिस्की, रम वगैरे) 30 ml चा पेग म्हणजे सुमारे 1 स्टँडर्ड ड्रिंक. स्ट्राँग बिअरची 650 ml ची बाटली म्हणजे सुमारे 4. कोणत्याही पेयाचा हिशोब त्याचे माप आणि लेबलवरची अल्कोहोलची टक्केवारी यांवरून करता येतो.
तल्लफ म्हणजे दारू पिण्याची तीव्र इच्छा. ती सहसा वाढते, शिखरावर पोहोचते आणि मग ओसरते. ती कशामुळे सुरू होते, आल्यावर काय करावे आणि वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घ्या.
पिण्याची सवय बदलत असताना अनेक जण पुन्हा पितात. एका घसरणीमुळे तुमची प्रगती वाया जात नाही. आज काय करायचे आणि सुरक्षिततेच्या कोणत्या दोन गोष्टी माहीत असायला हव्यात, ते इथे दिले आहे.
दुसऱ्या व्यक्तीच्या दारू पिण्यावर तुमचे नियंत्रण नसते, पण तुमच्या आधाराने फरक पडू शकतो. कसे बोलावे, काय टाळावे आणि सर्वांना सुरक्षित कसे ठेवावे, ते इथे दिले आहे.